पुणे : घरगुती सिलेंडरच्या वायु गळतीने घरामधे आग ; महिला जखमी
पुणे : आज पहाटे ०३•०५ वाजता (दिनांक २७•०९•२०२२) नरहे गाव, भैरवनाथ मंदिराजवळ, सोनाई निवास येथे चार मजली इमारत असलेल्या ठिकाणी तळमजल्यावरील घरामधे (हॉल-किचन) घरगुती सिलेंडरमधून वायुगळती झाल्याने स्फोट होत आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाला वर्दि मिळताच सिहंगड अग्निशमन केंद्राचे वाहन तातडीने घटनास्थळी रवाना झाले. घटनास्थळी पोहोचताच घरामधील वायुगळती असणारा सिलेंडर प्रथमतः बाहेर काढत जवानांनी