पुणे महापालिकेकडून आगामी गणेशोत्सवात 150 फिरत्या विसर्जन हौदांची सुविधा
पुणे : आगामी गणेशोत्सवासाठीचं नियोजन पुणे महापालिकेकडून सुरू झालं आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत १५० फिरते हौद उभारण्याचा निर्णय महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने घेतला आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत दीड दिवस, पाच, सात आणि दहा दिवसांच्या गणपतीचे विसर्जन केले जाते. त्यासाठी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून विसर्जन हौदांची उभारणी केली जाते. त्यानुसार विसर्जन हौदांच्या उभारणीचे नियोजन महापालिकेकडून करण्यात आले आहे.