शारदीय नवरात्र प्रारंभ , वाचा महत्व , पूजा विधी , धार्मिक मान्यता
घटस्थापना महत्व : हिंदू धर्मातील शारदीय नवरात्रोत्सवात घटस्थापनेला विशेष महत्त्व आहे. धार्मिक मान्यतांनुसार कलश हे देवता, ग्रह आणि नक्षत्रांचे निवासस्थान मानले जाते. कलश हे सुख-समृद्धी आणि शुभ कार्याचे प्रतीक मानले जाते. कलशालाच घट देखील म्हटले जाते. नवरात्रीमध्येही कलशाची स्थापना करून सर्व दैवी शक्तींचे आवाहन केले जाते. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. आश्विन शुद्ध प्रतिपदा