Narendra Dabholkar : दाभोळकरांची ‘हत्या ते न्याय’; कसा होता संपूर्ण घटनाक्रम?
पुणे : अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे प्रमुख नरेंद्र दाभोळकर (Narendra Dabholkar) यांच्या हत्या प्रकरणी तब्बल 11 वर्षांनी निकाल लागला आहे. या हत्येप्रकरणात पाच जणांविरुद्ध आरोप निश्चिती करण्यात आली होती, त्यापैकी तीन जणांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. तर दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पुणे सत्र न्यायालयाने सचिन अंदुरे आणि शरद कळकर यांना दोषी ठरवलं आहे.