राज्यातील ‘या’ 30 झेडपी अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर ; निवडणुकांचा मार्ग मोकळा
राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका राज्य सरकारने लांबणीवर टाकल्या आहेत. महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात राज्य सरकारने अद्याप कोणतेही घोषणा केलेली नाही. तर ग्रामविकास विभागाने 30 सप्टेंबर रोजी राज्यातील 30 झेडपी अध्यक्ष यांचे आरक्षण जाहीर केले. त्यामुळे आगामी काळात निवडणुका लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान राज्यातील सुमारे 30 जिल्हा परिषदांमध्ये अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.