India Meet : इंडिया आघाडीची समन्वयक समिती जाहीर; ‘या’ नेत्यांवर देण्यात आली जबाबदारी
मुंबई : मुंबईमध्ये आज इंडिया आघाडीची बैठक (India Meet) आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये (India Meet) देशभरातील विरोधी पक्षाचे नेते हे या बैठकीला हजर आहे. इंडिया आघाडीच्या समन्वयकपदी कुणाचा वर्णी लागणार? याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात होते. आता समन्वयकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.