Telangana Crime News : तेलंगणा हादरलं ! जमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील 6 जणांची हत्या
तेलंगणा : तेलंगणातून (Telangana Crime News) एक हादरवणारी घटना समोर आली आहे. यामध्ये संपत्तीच्या वादातून एका तरुणाने एकाच कुटुंबातील 6 जणांचा जणांची निर्घृणपणे हत्या केली आहे. एका 20 वर्षीय तरुणाने एकाच कुटुंबातील सहा जणांची हत्या केल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये दोन मुलांचाही समावेश आहे. संपत्तीच्या वादातून ही घटना घडल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली