Pune Crime News : सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक येथे कोयते-तलवारीने 10 ते 15 गुंडांकडून तिघांवर हल्ला
पुणे : पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक (Pune Crime News) येथे दहा ते पंधरा गुंडांनी भर रस्त्यावर तिघांवर कोयते व तलवारींने वार केल्याची घटना समोर आली आहे.यामधील जखमी तरुणांना उपचारासाठी किरकटवाडी फाट्याजवळील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या पाठीवर,पायांवर,हातांवर व कमरेवर खोल जखमा झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. काल रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या