Pune Crime News : प्रेमप्रकरण जीवावर बेतलं ! पुण्यातील ‘त्या’ हिरे व्यापाऱ्याची गुवाहाटीमध्ये हत्या
पुणे : पुण्यातील (Pune Crime News) एका हिरे व्यापाऱ्याचा मृतदेह गुवाहाटीतील एका हॉटेलमध्ये आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली होती. या व्यापाऱ्याची हत्या प्रेमप्रकरणातून झाली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. या हत्येप्रकरणी कोलकत्ता येथे राहणाऱ्या एका जोडप्याला अटक करण्यात आली आहे. संदीप कांबळे असे मृत हिरे व्यापाऱ्याचे नाव आहे. पुण्यातील शास्त्रीनगर येथील ते रहिवाशी