Gulabrao Patil : आईनंतर आता भावाचेही निधन; मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर कोसळला दु:खाचा डोंगर
जळगाव : मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या मातोश्रींचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्या दुःखातून सावरत असताना आता त्यांच्या भावाचेही निधन झाले आहे. त्यामुळे मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गुलाबराव पाटील यांचे छोटे भाऊ कैलास रघुनाथ पाटील यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.