Ganeshotsav : भाऊसाहेब रंगारी आणि लोकमान्य टिळकांमुळे पुण्याचा गणेशोत्सव जगभर लोकप्रिय – आमदार रवींद्र धंगेकर
पुणे : हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रींमंत भाऊसाहेब रंगारी यांनी सुरू केला. लोकमान्य टिळकांनी या गणेशोत्सवाचा (Ganeshotsav) प्रसार केला आणि पुढे पुण्याचा गणेशोत्सव संपुर्ण जगभर लोकप्रिय झाला असे प्रतिपादन आमदार रविंद्र धंगेकर यांनी केले.श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या गणेशोत्सवाचा वासा पुजन सोहळा सोमवारी पार पडला. या समारंभाला श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सव प्रमुख व विश्वस्त