Pune News : डॉन साठी पुणेकर ढसढसा रडले, लॅम्बोर्गिनी कारच्या धडकेत मृत्यू पावलेल्या ‘डॉन’ची इमोशनल INSIDE STORY
पुणे : डॉन…..पुण्यातील प्रसिद्ध अशा गुडलक चौकातील सगळ्यांचा तो लाडका होता. या भागात त्याचे अनेक ओळखीचे, जीवाभावाचे मित्र झाले होते. विशेष म्हणजे त्याला बन मस्का खूप आवडायचा. पण अचानक एक दिवशी लेम्बोर्गिनी कारने दिलेल्या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला. आणि याच डॉनला श्रद्धांजली देण्यासाठी अनेक पुणेकर युवक रस्त्यावर उतरले. अनेकांना आपले अश्रू आवरता आले नाही.