पुणे : कोथरुडमधील खचलेले रस्ते तातडीने दुरुस्त करा ! भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे आयुक्तांना पत्र
पुणे : गेल्या आठवड्याभरात पुणे शहर आणि आसपासच्या परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांची दुरावस्था झाली असून, अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे; तर काही ठिकाणी रस्ते खचले असल्याचे दिसून येत आहे. त्यासंदर्भात पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना पत्र लिहिले असून, तातडीने कोथरूड मधील रस्ते दुरुस्त करावेत, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी केली