ATM FRAUD ! एटीएम वापरताना काय काळजी घ्यावी ? फसवणुकीपासून व्हा सावध
ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. फोन पे गुगल पेसह एटीएम फसवणुकीच्या घटना देखील रोज घडतात. त्यामुळं एटीएम वापरताना काय काळजी घ्यावी आणि एटीएम फ्रॉड कसं टाळावं जाणून घ्या. एटीएममधून पैसे काढताना एटीएम पिनचा वापर काळजीपूर्वक करा. तसेच, गुप्तपणे पिन प्रविष्ट करा. लक्षात ठेवा की, तुम्ही एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलात तेव्हा तेथे कुणीही नसावे.