मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही झाडी कुठे गायब झाली ते सांगणार का ? आपचे राज्य प्रवक्ता मुकुंद किर्दत यांचा सवाल ; वाचा काय आहे प्रकरण
१९९५ च्या जवळपास पुणे-मुंबई एक्स्प्रेस महामार्गाची चर्चा सुरु झाली . तेव्हा पर्यावरणप्रेमींनी खूप आक्षेप घेतले होते. मुख्यत्वे सह्याद्री घाटातून हा रस्ता जात असल्याने मोठ्या प्रमाणावर वृक्ष तोड होणार होती . वन्यजीव हानी , गावांची विभागणी आणि संपर्क रस्ते अडचणी , मोकळ्या होणार्या दरडी आदी प्रश्न होते. मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होणार असल्याने एक लाखापेक्षा जास्त वृक्ष