CRIME NEWS : पुणे जिल्ह्यात बेकायदा गर्भलिंग निदान केंद्राचे आंतरजिल्हा रॅकेट ; गुन्हा दाखल – आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत
पुणे जिल्ह्यात फिरत्या मोटारींतून बेकायदा गर्भलिंग निदान केंद्राचे आंतरजिल्हा रॅकेट कार्यरत असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयात खटला सुरू असल्याची माहिती राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी आमदार माधुरी मिसाळ यांच्या प्रश्नाला उत्तर देताना विधानसभेत दिली. डॉ. सावंत म्हणाले, ‘‘इंदापूर तालुक्यातील मौजे सराटी या गावाच्या हद्दीत काही लोक बेकायदेशीरपणे