Pandharpur News : हृदयद्रावक ! दोन सख्ख्या भावांसह तीन शाळकरी मुलांचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू
पंढरपूर : पंढरपुरातून (Pandharpur News) एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये दोन सख्ख्या भावांसह तीन शाळकरी मुलांचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पंढरपूर तालुक्यातील करकंब गावात काल सायंकाळच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे करकंब गावावर मोठ्या प्रमाणात शोककळा पसरली आहे. गणेश नितीन मुरकुटे (वय 7 वर्ष), हर्षवर्धन नितीन