Pune News : खळबळजनक! पुण्यातील जत्रेत विजेचा शॉक लागून चिमुकल्याचा मृत्यू
Pune : पुण्यात एक धक्कादायक घटना घडली असून पुण्यातील एका जत्रेत आकाश पाळण्यात बसताना 9 वर्षाच्या मुलाचा शॉक लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.पुण्याच्या कात्रज परिसरातील जत्रेत ही घटना घडली आहे. कात्रज कोंढवा रस्त्यावर फॉरेन सिटी एक्झिबिशन नावाने फनफेअर भरवण्यात आलेल्या आकाश पाळण्यात बसताना गणेश पवार या 9 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.