Pune Firing : पुणे हादरलं ! पहाटेच्या सुमारास सिंहगड रस्त्यावरील भूमकर चौकात गोळीबार
पुणे : आज पहाटेच्या सुमारास पुन्हा एकदा पुणे हादरलं (Pune Firing) आहे. दोन दिवसात तीन गोळीबाराच्या घटना घडल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत भूमकर चौकात आज पहाटेच्या सुमारास गोळीबार झाला आहे. गणेश गायकवाड यांच्यावर गोळीबार झाला आहे. यात गणेश गायकवाड जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काय