CRIME NEWS : पुण्यातील कुख्यात गुन्हेगारावर पोलीस आयुक्तांची स्थानबद्धतेची कारवाई

Posted by - September 8, 2022

पुणे : काही दिवसांपासून पुणे पोलीस आयुक्त यांनी पुणे शहर आणि परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या सक्रिय अट्टल गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे धोरण अवलंबले आहे. आजपर्यंत 76 गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध करण्यात आले असून , आज विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील कुख्यात गुन्हेगार अक्षय नगरे वय वर्षे 23 या अभिलेखावरील अट्टल गुन्हेगारावर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली

Share This News