Solapur Crime News : सोलापूर हळहळलं ! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; दीड वर्षांच्या चिमुकलीचे छत्र हरपलं
बार्शी : सोलापूरमधील (Solapur Crime News) बार्शी या ठिकाणी एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये अज्ञात कारणावरुन पतीने पत्नीच्या डोक्यात दगडी वरवंटा घालुन तिची हत्या केली. शनिवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास तालुक्यातील जामगाव या ठिकाणी ही घटना घडली. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. या दाम्पत्याची दिड वर्षांची मुलगी रडत असल्याने व घरातून