Latur Crime News : लातूरमध्ये सिटी बसच्या चालक-वाहकाला किरकोळ वादातून बेदम मारहाण
लातूर : लातूरमधून (Latur Crime News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये लातूर शहरातील सिटी बस चालक आणि वाहकाला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली आहे. किरकोळ वादातून ही मारहाण करण्यात आल्याचे समजत आहे. दरम्यान, या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या प्रकरणात लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात 5 जणांविरुद्ध गुन्हा