Sports Minister Girish Mahajan : मागचे विक्रम मोडत राज्याला प्रथम आणण्यासाठी प्रयत्न करा
(बालेवाडी) पुणे : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी सर्वोत्कृष्ट कामगिरीच्या बळावर मागचे विक्रम मोडत राज्याला प्रथम क्रमांकाचा सन्मान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन राज्याचे क्रीडा मंत्री गिरीष महाजन यांनी केले. गुजरात येथे सुरू झालेल्या ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक