Mumbai-Pune Expressway : खोपोली एक्झिटपासून मुंबईकडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद
पुणे : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरुन (Mumbai-Pune Expressway) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. खोपोली एक्झिटपासून मुंबईकडे येणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. दुरुस्तीच्या कामासाठी या मार्गावरील वाहतुक बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असं आवाहन महामार्ग पोलिसांकडून करण्यात आले आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने प्रशासनाकडून