पुणे : रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी युद्धपातळीवर कामे करा – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
पुणे : शहरातील खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर करावे आणि त्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यासोबतच उपलब्ध मनुष्यबळात आवश्यकतेनुसार वाढ करावी , असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले. पुणे महानगरपालिका येथे शहरातील विकास कामांबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार गिरीष बापट, आमदार भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, आयुक्त विक्रम कुमार,