खड्ड्यांचे पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने स्वारगेट येथे आंदोलन ; रस्त्यावरील खड्यांमध्ये सोडली बदके आणि कागदी होड्या
पुणे : शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य झाले असून या खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होत असून, गेल्या काही दिवसांत या खड्ड्यांमुळे पुणेकरांचे बळी देखील गेले आहेत. आज पुण्याच्या रस्त्यावर पडलेले खड्डे हे गेल्या पाच वर्षात रस्त्यांच्या झालेल्या निकृष्ट दर्जाच्या कामांची साक्ष देत आहेत. गेल्या पाच वर्षात कोट्यवधी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेले