Ajit Pawar : अजित पवार यांना ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी निवडणूक आयोगाकडून क्लीन चिट
मुंबई : राज्यात सध्या निवडणुकीची धामधूम सुरु आहे. यादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. इंदापूर सभेत केलेल्या एका वक्तव्याप्रकरणी निवडणूक आयोगाकडून अजित पवारांना ‘क्लीन चिट’ देण्यात आली आहे. काय म्हणाले अजित पवार? काही दिवसांपासून इंदापूरमधील सभेत बोलताना अजित पवार यांनी विकास निधी हवा असेल तर उमेदवाराच्या चिन्हासमोरील ‘कचाकचा