IPL : KKR ला मिळाले प्लेऑफचे तिकीट; प्लेऑफमध्ये पोहोचणारा ठरला पहिला संघ
IPL 2024: कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सचा 18 धावांनी पराभव करून केकेआरने नववा विजय प्राप्त करून 18 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले आहे. यासोबत कोलकाता आयपीएल 2024 सीझनच्या प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. अवकाळी पावसामुळे सामना दोन तास 15 मिनिट उशिराने सुरू झाला होता. अचानक पाऊस पडल्यामुळे सामना 16-16 षटकांचा करण्याचा निर्णय घेण्यात आला