Yavatmal News : उष्णतेमुळे कोळसा डेपोला भीषण आग; 10 हजार टन कोळशाची झाली राख
यवतमाळ : यवतमाळच्या (Yavatmal News) वणी परिसरातील लालपुलीया परिसरातील जुगलकिशोर अग्रवाल यांच्या एफसीआयच्या कोल डेपोला तीन दिवसांपुर्वी अचानक भीषण आग लागली. अचानक लागलेल्या या भीषण आगीत सुमारे दहा हजार टनाच्या आसपास कोळसा जळून राख झाला आहे. दोन दिवसांपासून सलग धुसमत असलेल्या या आगीवर अखेर अग्निशमन दलाच्या पाच बंबातून फवारा मारून आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आले