पुण्यात फिल्मी थरार ! मैत्रिणीशी बोलतो म्हणून पठाणचा नुमविमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला
पुणे : पुण्यामध्ये आज फिल्मी सीनला शोभेल असे चित्र पाहायला मिळाले. अल्पवयीन मुलाने आज नुमवी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला केला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, पुण्यातील नूतन मराठी विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर तरुणाने हल्ला केला आहे. या मध्ये समीर पठाण याने विजय आरडे या विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला केला. समीर