CRIME NEWS : पेट्रोल पंपावरील कर्मचारी महिलेवर भरदिवसा कोयता हल्ला… सीसीटीव्ही व्हिडिओ पाहा
नाशिक : नाशिक जिल्ह्यातल्या पाथर्डी गावाजवळच्या एका पेट्रोल पंपावरील अत्यंत धक्कादायक दृश्ये समोर आली आहेत. अज्ञाताकडून भर दिवसा पेट्रोल पंपावरील कर्मचारी महिलेवर कोयत्याने वार करत जीवघेणा हल्ला करण्यात आला. ही चित्तथरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीये. नाशिकच्या पाथर्डी-वडनेर रोडवरील जाधव पेट्रोलियम पंपावर काम करणाऱ्या महिलेवर प्रमोद गोसावी या संशयित व्यक्तीने कोयत्याने सपासप वार केले. हा