PUNE CRIME : पुण्यात कोयता गॅंगची दहशत वाढली! वेळू पेट्रोल पंपावर दरोडा; चार कामगारांना जखमी करून रोकड लुटली, पहा व्हिडिओ
पुणे : पुण्यात कोयता गँगची दहशत दिवसेंदिवस वाढतच चाललीये. काल शुक्रवारी रात्री पुणे-सातारा महामार्गावरील वेळू येथील श्रीराम पेट्रोल पंपावर काही अज्ञातांनी कामगारांवर कोयत्यानं हल्ला करत 22 हजार रूपये लुटले. हा सारा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. पुणे-सातारा महामार्गावरील वेळू गावच्या हद्दीत तुषार जगताप यांच्या श्रीराम पेट्रोल पंपावर काल रात्री साडे अकराच्या सुमारास कोयता गॅंगनं दरोडा