Pune News : कोथुर्णे गावातील ‘त्या’ चिमुकलीला अखेर 20 महिन्यांनी न्याय मिळाला
पुणे : राज्याला हादरवून सोडणार्या मावळ तालुक्यातील (Pune News) कोथुर्णे गावात घडलेल्या घटनेतील सहा वर्षांच्या चिमुकलीला अखेर 20 महिन्यांनी न्याय मिळाला आहे. चिमुकलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार करीत तिची निर्घृण हत्या करणार्या नराधम तेजस ऊर्फ दादा महिपती दळवी (वय 24) यास पुण्याच्या विशेष न्यायालयाने शुक्रवारी फाशीची शिक्षा सुनावली, तर पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी नराधमाची