Maharashtra Board Exam : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेच्या वेळेसंदर्भात बोर्डाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या (Maharashtra Board Exam) हिताच्या दृष्टीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना 10 मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात येणार आहे. पेपरफुटी आणि कॉपीचे प्रकार टाळण्यासाठी बोर्डाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजेच एखाद्या पेपरसाठी 3 तासांचा वेळ देण्यात येत असेल