विद्यार्थ्यांनो बोर्ड परीक्षेदरम्यान झेरॉक्स दुकाने राहणार बंद; कॉपी प्रकरणाला आळा घालण्यासाठी विशेष मोहीम !
लवकरच दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा घेतल्या जाणार आहेत. दरम्यान कॉपी प्रकरणाला आळा घालण्यासाठी राज्य मंडळांना एक विशेष मोहीम आखली असून बोर्ड परीक्षेदरम्यान केंद्रापासून 100 मीटर अंतरापर्यंत असणाऱ्या झेरॉक्स दुकानांना बंद ठेवण्यात येणार आहे. कॉपीमुक्त परीक्षा व्हावी यासाठी प्रत्येक तालुक्यातील एक भरारी पथक असणार असून तालुक्यांमध्ये केंद्राची संख्या जास्त असल्यास एक पेक्षा अधिक भरारी पथक