रामदेवबाबांच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसची गुडलक चौकात निदर्शने
पुणे : कथीत योगगुरु रामदेव बाबा यांनी महिलांबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने गुडलक चौक येथे निषेध आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात “बाबा रामदेव – बाबा कामदेव” ,”बाबा रामदेव चा धिक्कार असो” , महिलांच्या सन्मानात……राष्ट्रवादी मैदानात” या घोषणा महिला भगिनींच्या वतीने करण्यात आल्या. भारतीय संस्कृतीमध्ये आपण स्त्रीचे आदिशक्ती आणि देवी म्हणून पूजन