केसरी टूर्सला ग्राहक न्यायालयाचा दणका ; सहलीसाठी भरलेले 55 हजार शुल्क व्याज व नुकसान भरपाई सहित देण्याचे आदेश
पुणे : आजीचे निधन झाल्याने सहलीसाठी पैसे भरलेले असताना सहल रद्द करून पुढच्या सहलीसाठी ते पैसे उपयोगात आणायची विनंती ग्राहकाने करूनही न जुमानणाऱ्या ‘ केसरी टूर्स ‘ या ट्रॅव्हल कंपनीने ग्राहकाला नुकसान भरपाई द्यावी, असा आदेश पुणे जिल्हा ग्राहक न्यायालयाने दिला आहे. यासंदर्भात ग्राहक मंगेश ससाणे यांनी वकिलांमार्फत ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल केली होती. ग्राहकाने