Ujjain Fire : उज्जैनच्या महाकाल मंदिरात भस्म आरतीवेळी गर्भगृहाला भीषण आग
उज्जैन : उज्जैनमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये उज्जैनच्या (Ujjain Fire) महाकाल मंदिरात सोमवारी भस्म आरती सुरू असताना गर्भगृहात आग लागली. या आगीमध्ये मंदिराच्या पुजाऱ्यासह पाच जण होरपळले आहेत. या आगीच्या घटनेत जखमी झालेल्या भाविकांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.