High Court : धाराशिवच्या नामकरणाबाबत उच्च न्यायालयाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
धाराशिव : उस्मानाबादचं नामकरण धाराशिव तर औरंगाबादचं नामकरण छत्रपती संभाजीनगर करण्यास राज्य सरकारनं (High Court) परवानगी दिली होती. दरम्यान उस्मानाबादचं नामकरण धाराशिव झाल्यानंतर नामांतरण विरोधी कृती समितीच्या वतीनं याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर आता ही याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. मुंबई उच्च न्यायालयाकडून धाराशिवच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.