Pune NIA Raid : इसिस मॉड्युल प्रकरणात NIA ची पुण्यात मोठी कारवाई; 3 जणांना अटक
पुणे : महाराष्ट्रात इसिस मॉड्युलशी संबंधित प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयएने पुन्हा एकदा पुण्यात (Pune NIA Raid) मोठी कारवाई केली आहे. एनआयएकडून पुण्यामध्ये दोन ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. एनआयएकडून कोंढवा आणि मोमीनपुरा भागात छापेमारी करण्यात आली आहे. कोंढवा तालाब फॅक्टरी परिसरात असलेल्या इसेन्शिया सोसयटीमध्ये शोएब अली शेख याच्या घरी एनआयएने छापा टाकला आहे.