Electoral Bond : सरकारकडे पैसा कुठून येतो याची माहिती आता सर्वसामान्यांना मिळणार; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इलेक्टोरल बॉण्डवर (Electoral Bond) सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. CJI चंद्रचूड अध्यक्ष असलेल्या 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा निर्णय सुनावला आहे. सरकारकडे पैसा कुठून येतो, हे जाणून घेण्याचा अधिकार देशातील प्रत्येक नागरिकांना आहे, असं म्हणत सर्वोच्च न्यायालयाकडून निर्णय फेटाळण्यात आला आहे. इलेक्टोरल बॉण्ड योजना असंवैधानिक असल्याने ते फेटाळले जावेत, असे