Nashik News : इगतपुरीजवळ दुचाकीचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू
नाशिक : नाशिक (Nashik News) मुंबई मार्गावर इगतपुरीजवळ दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बॅरिकेड्स तोडून दुचाकी थेट समोरील ट्रॅकवर आदळल्याने हा अपघात झाला आहे. समाधान देवराम भगत, सचिन कचरू पथवे असे या अपघातात मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे तर भाऊ भगत हे या अपघातात जखमी झाले आहेत.