Marathi Compulsory: इंजिनीअरिंगमध्ये मराठी सक्तीची, शिक्षण विभागाने घेतला मोठा निर्णय
मुंबई : पहिली ते दहावीमध्ये माध्यमात मराठी भाषेची या आधीच सक्तीची (Marathi Compulsory) करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर उच्च आणि तंत्रशिक्षण विभागातील इंजिनीअरिंगमध्येही मराठी सक्तीची करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शालेय शिक्षण विभागाने हा मोठा निर्णय घेतला आहे. विश्व मराठी संमेलन 2024 हे वाशी येथे सुरु असून शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी घोषणा केली.