भाजपचे दिवंगत नेते माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांची तिसरी कन्या यशश्री मुंडे (YASHASHREE MUNDE) निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहे. याला निमित्त आहे वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव बँकेच्या निवडणुकीचं… ऑगस्टला संचालक मंडळाची निवडणूक पार पडणार आहे. याचा निवडणुकीसाठी यशश्री मुंडे यांनी अर्ज दाखल केलाय. नेमक्या कोण आहेत यशश्री मुंडे पाहूयात…
गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा आणि प्रीतम या दोघेही राजकारणात सक्रिय आहेत. पंकजा मुंडे या राज्यमंत्री आहेत तर प्रीतम मुंडे लोकसभेवरून खासदार आहेत. हे दोघीही राजकारणात साखरे असल्या तरी यशस्वी मुंडे मात्र राजकारणापासून दूर असल्याचा पाहायला मिळालं मात्र मागील दोन दसरा मेळाव्यात यशश्री मुंडे पंकजा मुंडेंसोबत व्यासपीठावर पाहायला मिळाला त्याच वेळी त्यांची राजकारणात लॉन्चिंग होत असल्याचं बोललं जात होतं.
येत्या १४ जुलैला उमेदवारांची छाननी आणि 15 ते 19 जुलै दरम्यान अर्ज मागे घेण्याचा कालावधी असून यानंतरच याचे चित्र स्पष्ट होणार आहे एकूण 17 जागांसाठी हे निवडणूक होत असून दहा ऑगस्टला मतदान तर बारा रोजी मतमोजणी होणार आहे या निवडणुकीनिमित्ताने दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या तिसऱ्या मुलीचं लॉन्चिंग होणार आहे.
यशश्री मुंडे पंकजा आणि प्रीतम मुंडे यांची बहीण असून त्या पेशाने वकील आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांचा अमेरिकेतील कॉर्नल विद्यापीठाकडून प्रॉमिसिंग आशियाई स्टुडन्ट म्हणून गौरवही करण्यात आला. पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांचं शिक्षण मराठी माध्यमातून झालं असलं तरी यशश्री यांचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालं आहे.
दरम्यान निवडणुकीचे अर्ज सौदा जुलै रोजी छाननी साठी घेतले जाणार असून 15 ते 29 जुलै दरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा कालावधी आहे. यानंतरच निवडणुकीचे स्वरूप स्पष्ट होईल. एकूण 17 जागांसाठी ही निवडणूक होत असून 10 ऑगस्ट रोजी मतदान आणि 12 ऑगस्ट ला मतमोजणी होणार आहे.
आतापर्यंत वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव बँकेच्या संचालक मंडळावर पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनल बिनविरोध निवडून आले आहे त्यामुळे यंदाही यशस्वी यांच्या नेतृत्वाखालील पॅनल बिनविरोध निवडले जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.