BARAMATI AJIT PAWAR PC

पुणे, पिंपरी- चिंचवडमध्ये का झाला पराभव? स्वतः अजित पवारांनी सांगितलं कारण

53 0

राज्यातील महापालिका निवडणुकांच्या निकालात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) गटांना मोठा धक्का बसला आहे. विशेषतः पुणे(PUNE) आणि पिंपरी-चिंचवड (PCMC) महानगरपालिकांमध्ये अपेक्षेप्रमाणे यश न मिळाल्याने पक्षाची कामगिरी समाधानकारक राहिली नाही. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार(AJIT PAWAR) हे शुक्रवारी रात्री उशिरा बारामतीत (BARAMATI) दाखल झाले.

शनिवारी सकाळी अजित पवार(AJIT PAWAR) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार(SHARAD PAWAR)  यांची बारामतीतील गोविंद बाग निवासस्थानी भेट घेतली. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे(SUPRIYA SULE), खासदार अमोल कोल्हे(AMOL KOLHE), ज्येष्ठ नेते जयंत पाटील (JAYANT PATIL), माजी मंत्री राजेश टोपे(RAJESH TOPE), आमदार रोहित पवार(ROHIT PAWAR) यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते.

शुक्रवारी जाहीर झालेल्या २९ महापालिकांच्या निकालात दोन्ही राष्ट्रवादी गटांना अपेक्षित यश मिळाले नाही. पुणे (PUNE)आणि पिंपरी-चिंचवडमध्ये(PCMC) दोन्ही पवार गटांनी एकत्र निवडणूक लढवली होती, मात्र निकाल पक्षाच्या बाजूने लागले नाहीत.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार बारामतीतील(BARAMATI) बैठकीत आगामी जिल्हा परिषद(JILLA PARISHAD) आणि पंचायत समिती निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस(NCP) गटांनी एकत्रितपणे लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीनंतर शरद पवार(SHARAD PAWAR) आणि अजित पवार (AJIT PAWAR) यांनी संयुक्तपणे ‘कृषी 2026’ प्रदर्शनाचे उद्घाटन केले.

 

 

Share This News
error: Content is protected !!