ऐन दिवाळीत Whatsapp चा ‘सर्व्हर डाऊन’; नेटकरी त्रस्त

284 0

जगभरात कोट्यवधी युजर्स असणारं व्हॉट्सअ‍ॅप भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी दुपारी १२च्या सुमारास डाऊन झालं. त्यामुळे जगभरातील युजर्स ट्विटरवर येऊन यासंदर्भात ट्वीट्स करू लागले आहेत.

जगभरातील ऑनलाइन आउटेजचा मागोवा घेणाऱ्या डाउनडिटेक्टर या वेबसाइटने व्हॉट्सअॅपच्या आउटेजची तक्रार करणाऱ्या वापरकर्त्यांच्या संख्येत मोठी वाढ दर्शवली आहे.

अनेकजण मेसेजिंग, महत्त्वाच्या फाईल्स ट्रान्सफर करण्यासाठी व्हॉट्सअॅपचा वापर करतात. व्हॉट्सअॅप हा अनेकांच्या दैनंदिन आयुष्याचा एक भाग झाला आहे. व्हॉट्सअॅप डाऊन झाल्याने कोट्यवधी युजर्सचा त्याचा फटका बसला आहे.

मागील वर्षी देखील फेसबुकच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने WhatsApp ची सेवा ठप्प पडली होती. त्यानंतर पुन्हा एकदा WhatsApp डाऊन झाले आहे.

ट्वीटरवर युजर्सकडून याबाबत वेगवेगळे दावे करण्यात येत आहे. WhatsApp चा सर्व्हर क्रॅश झाल्याने सेवा खंडीत झाल्याचा दावा करण्यात येत आहे. युजर्सकडून इतर मेसेजिंग अॅपचा वापर करण्यात येत आहे.

सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस

#WhatsAppDown च्या ट्रेंडसह युजर्सकडून मिम्सचा वर्षाव सुरू आहे. व्हॉट्सअॅप डाऊन झाल्यानंतर युजर्सकडून मिम्स व्हायरल करण्यात येत आहेत.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide