Vinod Tawde

विनोद तावडे यांच्या खांद्यावर पुन्हा मोठी जबाबदारी; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या समितीत झाला समावेश

6825 0

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून नुकतीच जाहीरनामा समितीची घोषणा करण्यात आले असून केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे.

एकूण 27 जणांची ही जाहीरनामा समिती असून या जाहीरनामा समिती महाराष्ट्रातील नेते माजी शिक्षण मंत्री आणि सध्याचे भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांच्या नावाचा देखील समावेश करण्यात आलाय.


2019 च्या लोक विधानसभा निवडणुकीवेळी विनोद तावडे यांचं तिकीट कापण्यात आलं होतं मात्र त्यानंतर वर्षभराच्या कालावधीतच विनोद तावडे यांचा पुनर्वसन करत राष्ट्रीय पातळीवर सरचिटणीस म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्यानंतर वर्षभरातच विनोद तावडे यांनी केंद्रात आपल्या नेतृत्वाची अशी काही चुणूक दाखवून दिली की विविध जबाबदाऱ्या या विनोद तावडे यांच खांद्यावर राष्ट्रीय पातळीवर देण्यात आल्यात. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मन की बात या कार्यक्रमाच्या संयोजनाची जबाबदारी ही विनोद तावडे यांनी काही काळ सांभाळली त्यानंतर आता त्यांचा थेट जाहीरनामा समितीत समावेश करण्यात आला आहे.

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनाही या जाहीरनामा समितीत स्थान देण्यात आला आहे.

 

Share This News
error: Content is protected !!