MLC ELECTION:

महत्वाची बातमी, विधान परिषदेच्या मतमोजणीला अखेर सुरुवात.LIVE UPDATE

216 0

मुंबई- काँग्रेसने भाजप आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या मतदानावर आक्षेप घेतल्यामुळे रखडलेली मतमोजणी अखेर सुरु झाली आहे. लवकरच या निवडणुकीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. दोन ताणाच्या विलंबानंतर मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

  • पहिल्या पसंतीच्या मतमोजणीला सुरुवात
  • बाजूला काढलेली दोन्ही मते बाद करून मतमोजणीला सुरुवात
  • उमा खापरे यांच्या कोट्यातील एक मत बाद ? 
  • एक मत बाजूला ठेवल्यानंतर २८४ मते ठरवणार निकाल
  • बाजूला ठेवलेले एक मत कुणाचा घात करणार याकडे सर्वांचे लक्ष
  • भाजप आणि राष्ट्रवादीच्या वादानंतर रामराजे निंबाळकर यांच्या कोट्यातील एक मत बाजूला
  • रामराजे निंबाळकरांच्या कोट्यातील एक मत बाद
  • महाविकास आघाडीचाच गुलाल उधळला जाणार
  • शिवसेनेचे दोन्ही उमेदवार सुरक्षित
  • खडसे समर्थकांनी विधान भवनाबाहेर टरबूज फोडून भाजपची उडवली खिल्ली
  • बाळासाहेब थोरात विधान भवनात दाखल 
  •  विधानभवनाबाहेर सर्वपक्षीय समर्थकांची गर्दी, जोरदार घोषणाबाजी
  • सर्वच्या सर्व २८५ आमदारांची मते वैध

 

निकालाची आकडेवारी पुढीलप्रमाणे-    

भाजप                                    मिळालेली मते

श्रीकांत भारतीय

प्रवीण दरेकर

उमा खापरे

राम शिंदे

प्रसाद लाड

 

राष्ट्रवादी काँग्रेस

रामराजे निंबाळकर

एकनाथ खडसे

 

काँग्रेस

भाई जगताप

चंद्रकांत हंडोरे

 

शिवसेना

आमश्या पाडवी

सचिन अहिर

 

 

 

काय होता काँग्रेसचा आक्षेप ?

दुर्धर आजाराने ग्रस्त असतानाही आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी पुण्याहून मुंबईला आले. विधान परिषदेसाठी गुप्त मतदान करण्याची पद्धत आहे. परंतु, असे असताना आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांनी दुसऱ्याच्या हातात मतपत्रिका दिल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. मतदान करताना दोन्ही आमदारांनी मतपत्रिकेवर सही केली. परंतु,पसंतीची मतं देत असताना जगताप आणि टिळक यांनी ऐवजी दुसऱ्याची मदत घेतली असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला.

त्यावर काँग्रेसने राज्य निवडणूक आयोगाकडे आक्षेप दाखल केला. राज्य निवडणूक आयोगाने हा आक्षेप फेटाळल्यानंतर काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली. केंद्रीय निवडणूक आयोगाने देखील काँग्रेसचा आक्षेप फेटाळला. त्यानंतर मतमोजणीला सुरुवात करण्यात आली.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!