मोठी बातमी ! शिवसेनेचे बंडखोर आमदार थांबलेल्या रॅडिसन हॉटेलवर तृणमूल काँग्रेसचा हल्ला

116 0

गुवाहाटी- एकनाथ शिंदे गटातील शिवसेना आमदारांचा मुक्काम असलेल्या गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलवर तृणमूल काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी हल्लाबोल केला आहे. मात्र या ठिकाणी आसाम पोलीस आणि निमलष्करी दलाचा कडेकोट बंदोबस्त आहे. त्यामुळे तृणमूलच्या कार्यकर्त्यांना हॉटेलमध्ये शिरता आलेले नाही.

एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना घेऊन सुरुवातीला सूरतच्या ली मेरेडियन हॉटेलमध्ये दाखल झाले होते. मात्र सुरत -मुंबई अंतर जवळचे असल्यामुळे त्यांच्याशी सहजपणे संपर्क साधने शिवसेनेला शक्य होते. त्यामुळे या सर्व आमदारांना हवाई मार्गाने गुवाहाटीत आणण्यात आले होते. गुवाहाटीच्या रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये या सगळ्यांना ठेवण्यात आले आहे. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा आणि भाजपच्या कार्यकर्त्यांकडून शिवसेनेच्या या बंडखोर आमदारांची काळजी घेतली जात आहे.

याठिकाणी शिवसेना पोहोचू शकणार नाही त्यामुळे शिवसेनेतील बंडखोर आमदार निश्चिंत होते. मात्र, आज सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलवर अचानक हल्लाबोल करत सर्वांनाच अचानक धक्का दिला. हॉटेल रॅडिसन्स बाहेर घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे गोंधळ उडाला. कोणाताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी हॉटेलच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी असलेले पोलीस सतर्क झाले. तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत हॉटेलमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. मात्र या ठिकाणी आसाम पोलीस आणि निमलष्करी दलाचा कडेकोट बंदोबस्त आहे. त्यामुळे तृणमूलच्या कार्यकर्त्यांना हॉटेलमध्ये शिरता आले नाही.

आसाममध्ये आलेल्या पूरामध्ये आसामच्या नागरिकांचे हाल सुरू आहेत. महाराष्ट्रातील राजकीय नाट्याची चिंता न करता आसाम सरकारने राज्यातील नागरिकांची चिंता करावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. हॉटेल रॅडिसन ब्लूमध्ये शिवसेना आमदारांचा घोडेबाजार सुरू आहे. त्यासाठी कोट्यवधींचा चुराडा होत आहे. त्यांच्यावर खर्च करण्याऐवजी सरकारने पूरग्रस्तांना मदतीचा हात द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या आमदारांना निघून जाण्यास सांगावे, अशी मागणी केली.

एकूणच या घटनेवरून राष्ट्रीय स्तरावरील मित्रपक्ष असलेला तृणमूल काँग्रेस शिवसेनेला मदत करत असल्याचे दिसून येत आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!