शाळेतील तीन विद्यार्थ्यांना विहिरीकडे नेऊन विहिरीत कासव असल्याचं सांगत विहिरीत पाहायला लावलं व बेसावध असताना तिन्ही विद्यार्थ्यांना थेट धक्का देऊन आरोपी पसार झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे.
हा प्रकार नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील वडगावर पिंगळमध्ये घडला. या प्रकरणी या तीनही मुलांच्या पालकांनी पोलिसात धाव घेत तक्रार नोंद केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कितीही मुलं अल्पवयीन असून शाळेत शिकतात. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील वडगाव पिंगळमध्ये ही मुलं वास्तव्यास आहेत. तीन आरोपींनी या तिन्ही मुलांना जवळच्या विहिरीत कासव असल्याचं सांगितलं. त्यामुळे ही मुलं कासव पाहण्यासाठी विहिरीजवळ गेली. तिघेही पाण्यात डोकावून कासव शोधू लागली. तेवढ्यात आरोपींनी या मुलांना जीवे मारण्याच्या उद्देशाने विहिरीत ढकलले. तिन्ही मुलं पाण्यात पडतात आरोपींनी पलायन केले.
पाण्यात पडल्यानंतर आपला जीव वाचवण्यासाठी ही मुलं प्रयत्न करू लागली. त्यातील एका मुलाने विहिरीत बांधलेल्या दोराला पकडून वर येण्याचा प्रयत्न केला. व इतर दोन्ही मित्रांनाही विहिरीच्या बाहेर काढून त्यांचा जीव वाचवला. त्यानंतर या मुलांनी घरी जाऊन आई-वडिलांना घडलेल्या प्रकार सांगितला. या मुलांच्या पालकांनी थेट पोलीस ठाणे गाठून पोलिसांत तक्रार दाखल केली. तसेच पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली असून या मुलांना जीवे मारण्याचा प्रयत्न नेमका का झाला याचा तपास सुरू आहे.